Gudi Padwa and Property Buying

गुढीपाडव्याचा मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहुर्तापैकी एक. त्यामुळे महत्त्वाची खरेदी करायला या दिवशी प्राधान्य दिले जाते. म्हणूनच सोनेनाणे, जागा, घरखरेदीच्या बाजारपेठेला या दिवशी विशेष उठाव असतो.

सण-समारंभ हा आपल्या समाजाच्या जगण्याचा अविभाज्य घटकच म्हणायला हवा. किंबहुना आपली जीवनशैली सणांशीच जोडलेली आहे. आजच्या शहरीकरणाचा वारा लागला नव्हता तेव्हा सण साजरे करताना कृषी संस्कृतीचा आधार होता. आज भरमसाट शहरीकरणात सणांना उत्सवाचे स्वरूप आले आहे. त्यातच गुढीपाडव्यासारखा सण हा तर सध्या अनेक प्रकाराने गाजतो. कोणी त्याला मराठी नवीन वर्ष म्हणते, तर कोणी त्याला िहदूचे नवीन वर्ष म्हणून संबोधते. गेल्या काही वर्षांत तर शोभायात्रेच्या माध्यमातून त्याला चांगलेच उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे. अर्थात असे असले तरी काही बाबतीत हा सण आजही त्याच्या काही महत्त्वाच्या बाबींना धरून आहे. साडेतीन मुहूर्तापकी एक मूहर्त म्हणून त्याचे महत्त्व आजही आहे आणि त्यामुळेच अनेक नव्या गोष्टींची सुरुवात असो की काही विशिष्ट खरेदी असो हा गुढीपाडवा हे एक चांगले निमित्त झाले आहे.

एखाद्या नव्या गोष्टीची सुरुवात करताना चांगला दिवस पाहावा ही आपल्याकडची अगदी जुनी मानसिकता. अनायासेच हा मुहूर्त साधता येत असेल तर उत्तम अशी भावना निर्माण होणे साहजिक आहे, त्याचेच प्रतििबब या दिवशी पडलेले दिसते. एकतर त्या दिवशी एकूणच समाजातील वातावरण नेहमीच्या कटकटींपासून काहीसे दूर जात उत्साहाचे असते. त्यामुळे मग ती सोने खरेदी असो की नवीन वाहन, की एखाद्या व्यवसायाची सुरुवात. गुढीपाडव्याला अशा अनेक गोष्टी होताना दिसतात.

भारतीय समाजाची गुंतवणुकीची मानसिकता ही फारच गुंतागुंतीची आहे. आजकालचे पोर्टफोलिओ वगरे शब्द नसताना देखील तो अनेक वेळा पसे वेगवेगळ्या माध्यमातून साठवून ठेवायचा. पसे गुंतवण्याचे त्याचे अगदी सोपे आणि खात्रीचे माध्यम म्हणजे सोने खरेदी. जसं जमेल तसे सोने घेत राहणे ही त्याची पूर्वापार पद्धत. अशा वेळी मुहूर्तावरचे सोने म्हणजे त्याच्यासाठी संधीच असते. त्यामुळे दसरा, दिवाळी पाडवा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया या दिवसांना हमखास सोने खरेदी केली जाते. सध्या याही क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे. काही व्यावसायिकांच्या मते लोक सध्या गरजेनुसारच खरेदी करत आहेत. पण गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून खरेदी वाढू शकते अशी अपेक्षा या क्षेत्रातून होताना दिसत आहे. मात्र चन म्हणून होणारी सोने खरेदी या दिवशी होताना फारशी दिसत नसते असे व्यावसायिक नमूद करतात.

साडेतीन मुहूर्तापकी एक असल्यामुळे कोणत्याही खरेदीसाठी उत्तम असा हा दिवस गेल्या काही वर्षांत सर्वाधिक चच्रेत असतो तो घर खरेदीसाठी. गेल्या दोन वर्षांत गृह खरेदी बाजारात चांगलीच मंदी आल्यामुळे या बाजाराला यंदाच्या गुढीपाडव्याकडून सर्वात जास्त अपेक्षा आहेत. त्याचेच प्रत्यंतर अगदी १५ दिवस आधीपासूनच आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातून दिसून येत आहे. मोबाइलवर येणारे मेसेज, विविध वृत्तपत्रांतील पान पानभर जाहिरातींतून हा अनेक योजनांचा सध्या ग्राहकांवार भडिमार होताना दिसत आहे. खरे तर गेल्या दहा वर्षांत सर्वाधिक उसळी मारलेले क्षेत्र कोणते असेल तर ते गृहनिर्माण हेच आहे. दुपटी-तिपटीने वाढलेले दर पाहता सर्वसामान्यांच्या आवाक्यातील घराचे स्वप्न पूर्ण होणारच नाही की काय अशी परिस्थिती उद्भवली आहे. पण गेल्या एक वर्षांत येथील भाव बरेच खाली आले आहेत. पण ते ज्या गतीने वाढले त्यापेक्षा खाली आलेले नाहीत. दीड वर्षांपूर्वीचे निश्चलीकरण आणि त्यानंतर आलेला जीएसटी या दोहोंमुळे एकंदरीतच या क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. पण या वर्षांच्या केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकात २०२२ पर्यंत एक कोटी घरांचा संकल्प केल्यामुळे या क्षेत्राला सध्या चांगलाच हुरूप आलेला आहे. मात्र आज तयार असणाऱ्या प्रकल्पांची विक्रीची टांगती तलवार या सर्वावर आहेच. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा त्यांना कसा लाभदायी ठरेल याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. खरे तर या क्षेत्रात खूप मोठे बदल होत आहेत. कधी काळी केवळ मोठय़ा शहरांशी निगडित असलेली ही बाजारपेठ सध्या मध्यम शहरांवर केंद्रित होताना दिसत आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांची केंद्रीय संस्था क्रेडाईने सादर केलेल्या एका ताज्या अहवालानुसार तरुण वर्ग हा यापुढे महत्त्वाचा ठरणार असल्याचे दिसून येत आहे. तर महानगरांऐवजी छोटय़ा शहरांकडून या क्षेत्रातील भरभराट वाढणार असल्याचे म्हटले आहे. आजही देशातील ८२ टक्के तरुण हे आई-वडिलांच्या बरोबर राहात असून त्यांना नवीन घर घेण्याची इच्छा असल्याचे या अहवालातून दिसून आले आहे. आणि २०२० पर्यंत देशातील तरुणांची संख्या ही ६५ टक्के (३५ वर्षांखालील) असणार आहे. एकंदरीतच या क्षेत्रात बरीच अपेक्षा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर त्याची सुरुवात व्हावी अशी आशा आहे.

खरेदी ही जणू काही आपली आदिम प्रेरणा असल्यासारखेच आहे. मात्र गेल्या काही वर्षांत शॉिपग या विषयाला जी काही तथाकथित प्रतिष्ठा वलय लाभले आहे त्यामुळे प्रत्येकाला हे शॉिपग करायचे असते. अशा वेळी सणासुदीच्या दिवसांत व्यापारी चांगल्या प्रकारे लाभ करून घेतात. आत्तापासून वेगवेगळ्या सेलचे फलक आपल्याला दिसायला लागतील. त्यातच सध्या भर पडली आहे ती ऑनलाइन शॉिपगची. शहरातीलच नाही तर अगदी छोटय़ा मोठय़ा गावांतील तरुणाईदेखील या ऑनलाइन शॉिपगच्या सेलकडे डोळे लावून बसलेली असते. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मग अशा सेलचा फायदा ग्राहकांना नक्कीच मिळतो. कोणत्याही समाजातील उत्सवप्रियता आणि बाजारपेठेचे एक गणित असते. ख्रिसमसमध्ये युरोपातल्या बाजारपेठा फुलून येतात. तर रमजानच्या काळात मुस्लीम भागातील बाजारपेठा फुलतात. िहदूंचे सण तर वर्षभरच असतात. त्यानिमित्ताने बाजारपेठा फुलल्या नाहीत तरच नवल.


***

Find Best Eye-catching discounts on Few Best Properties

• Special Discount on Spot Booking
Silver Treasure - Garve Group
1 and 2 BHK Smart Homes starting from 16Lacs*

• No Registration Charges, Stamp Duty or Any Hidden Cost
R Zone Plots - Ranka Developers
Plots 7 lacs Per 1,000 sqft All Inc.

Find out More property for Gudi Padwa Discount...